sakshi ganesha

Sakshi Ganesh

Nashik Bappa

श्री श्रीमंत साक्षी गणपती मंदिर

नाशिक जिल्ह्यामधे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून परवानगी घेऊन श्री गणेश मूर्तीच्या ह्रदयस्थानी एक विशेष श्री गणेश यंत्राची स्थापना करुन भद्रकाली मंदिराच्या जवळ वीस वर्षांपूर्वी ‘‘साक्षी गणेश’’ या नावाने श्री गणेशांची स्थापना करण्यात आली. या मुर्तीची विशेषता अशी आहे की या केले आहे. याशिवाय पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे विशिष्ट एम्बॉयसिंग पद्धतीने बनवलेला सोनपितळ धातूचा हा महाराष्ट्रातील एकमेव गणपती आहे. सुमारे १२१ किलो वजनाची श्री गणेश मुर्तीच्या या मंदिराला ३५ लाख रुपये खर्च आलेला आहे. हा ‘‘साक्षी गणेश’’ गणपती नवसाला पावतो असे म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *