navshya ganapati

Navashya Ganapati

Nashik Bappa

श्री नवश्या गणपती मंदिर

श्री नवश्या गणपती मंदिर हे स्थान आनंदवल्ली, गंगापुर रोड, नाशिक (जि.) येथे प्रस्थापित असुन अत्यंत जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणुन हे मंदिर जाणले जाते आणि म्हणुनच यांस श्री नवश्या गणपती म्हटले जाते. ह्या मंदिरास तीनशे – चारशे वर्षांचे ऐतिहासिक महत्व आहे. इ.स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात श्री सजोबा दादा व त्यांची पत्नी श्रीमती आनंदीबाई यांनी ह्या मंदिराची स्थापना केली. प्रसिद्ध श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे आजोळ असलेलं गांव. अशी आख्यायिका अशी आहे की श्री राघोबा दादा व आनंदीबाईस १५ ऑगस्ट १७६४ रोजी पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव ‘विनायक’ असे ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्म प्रित्यर्थ चावंडसचे नाव बदलून ‘‘आनंदवल्ली’’ ठेवण्यात आले. दरम्यान श्री नवश्या गणपती मंदिराची स्थापना करण्यात आली. ही मुर्ती पुर्वाभिमुख असुन प्रसन्न मुद्रेत विराजमान आहे. या श्री गणेश मुर्तीला चार हात असुन त्यात पाश, मोदक, फुल व आशिर्वाद मुद्रा शोभुन दिसते. प्रत्येक हातांत कडे आहे. मुळ मुर्तीचे मुकूट शोभुन दिसते. श्री राघोबा दादांनी आनंदवल्लीस मोठा राजवाडाही बांधला. असे म्हटले जाते की, या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यानंतर श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. इ.स. १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवीली, त्यावेळी आनंदवल्लीचा वाडाही इंग्रजांद्वारे जाळला गेला. मात्र या परिसरातील मंदिरे शाबुत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्याच्या कार्यकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *