chandicha ganapati

Chandicha Ganapati

Nashik Bappa

श्री चांदीचा गणपती मंदिर

नाशिक जिल्ह्यातील मानाचा गणपती म्हणून ‘‘चांदीचा गणपती’’ देवस्थान प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचा कार्यभार ‘‘रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ, नाशिक’’ मार्फत सांभाळला जातो. सदर मंडळाला २०२० – २०२१ साली ९९ वर्षे पूर्ण झाली आहे. माननिय श्री. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने नाशिकमधील कै. श्री. गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई यांनी गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी सार्वजनिक स्वरुपांत मंडळाचा कार्यभार संभाळण्यासाठी गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई ट्रस्ट ची स्थापना केली, त्याचप्रमाणे रविवार पेठेतील गणेश भक्तांना विश्वस्त म्हणुन नेमले आणि तेव्हापासून कै. विष्णु रहाळकर, कै. दादासाहेब गद्रे, कै. सिताराम दादा पवार ते आजपावेतो अनेक मान्यवरांचे ‘‘रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाला’’ मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. सदर मंडळाचे सद्यस्थितीत कार्यभार अध्यक्ष – श्री. नरेंद्र हिरामण पवार, उपाध्यक्ष – श्री. चंद्रकांत ओंकार विसपुते, कार्याध्यक्ष – श्री. प्रफुल्ल बुधमल संचेती, सेक्रेटरी – श्री. रविंद्र भगतराव पाटील, सह. सेक्रेटरी – श्री. जगदीश वसंतराव भुजबळ, खजिनदार – श्री. शेखर रामदास आठवले यांच्यामार्फत पाहिला जातो. सन १९७८ साली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘‘श्रीं’’ ची चांदीची मुर्ती तयार करण्याचा संकल्प केला, त्यास महाराष्ट्रामधुन अनेक गणेश भक्तांचा योगदान प्राप्त झाला. या योगदानातुनच प्रस्तुत ‘‘श्रीं’’ ची २०१ किलो चांदीची मुर्ती बनली. सदर मंडळामार्फत धर्मार्थ दवाखाना अगदी अत्यल्प दरांत उपचारासाठी उपलब्ध आहे. सदर मंदिराची व्यवस्थापन समिती ‘‘श्रीं’’च्या चरणी कार्यरत आहे, त्याचे कार्यभार श्री. महेंद्र हिरामण पवार, श्री. भानोसे सर, श्री. सुभाष रामचंद्र दंडवते, श्री. हेमंत सुरेश पवार, श्री. नरेंद्र चांदवडकर, श्री. प्रदिप माधवराव भागवत, श्री. रविंद्र तुकाराम पवार, श्री. जगदीश वसंतराव भुजबळ, श्री. नितिन बाळासाहेब पवार, श्री. हेमंत पन्नालाल बोरा, श्री. किशोर बबनराव ठाकरे, श्री. सुनिल विष्णु मराठे यांच्यामार्फत पाहिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *