ranjangaon mahaganapati

Ranjangaon Mahaganapati

Ashtvinayak

रांजणगांव – श्री महागणपती

अष्टविनायकांमध्ये आठवे स्वयंभू आहे ‘‘श्री महागणपती’’. हे स्वयंभू रांजणगांव या पवित्र ठिकाणांस विराजमान आहे. रांजणगांव हे स्थान पुणे जिल्ह्यात असून पुणे शहरावरुन हे ठिकाण ५० कि.मी. अंतरावर आहे. या स्वयंभूच्या प्रकटीकरणाबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे, ती अशी – इंद्रपुत्र गृत्समद ऋषींना एकदा एक मोठी शिंक आली व त्यातून एक भव्य पुरुष निर्माण झाला. त्याने अंतराळात तीन पुरे निर्माण केली म्हणून त्याला “त्रिपुरासूर” या नाव प्राप्त झाले, आणि मग या त्रिपुरासूराने आपली सेना निर्माण करुन सर्व देवतांना त्रासून सोडले. या त्रिपुरासूराला मारण्यास सर्व देवतागण श्री महादेवांकडे आले असतांना श्री महादेवांनी तात्काळ श्री गणेशांना आपली संहारशक्ती त्रिशुळाला अर्पण करण्यास सांगितले. यावर श्री गणेशांनी आपली सबंध संहारशक्ती श्री महादेवांच्या त्रिशुळाला दिली. त्या त्रिशुळाने श्री महादेवांनी त्रिपुरासूराचा वध करुन श्री गणेशांची “महागणपती” रुपाने स्थापना केली. गणेश पुराणांत या स्थानाला मणिपूर नावाने वर्णिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *