About us

               ॥ श्री गणेशाय नम: ॥

              ॥ शुद्ध वाचा शुद्ध विचार
               विशुद्धी आचरणाचा ठेवा....
              देव मुलाधारी जाणुया
              बोला गणपती बाप्पा मोरया...॥
                    ॥ मन्वंतर ॥ 

‘‘नाशिक बाप्पा’’ वेबसाईटची निर्मिती ‘‘शिर्डी साईनाथ संस्था’’,नाशिक च्या माध्यमातुन करण्यात आली आहे. श्री गणेशांविषयी देण्यात आलेली माहिती पौराणिक संदर्भ तसेच जाणकारांच्या माहितीवरून उपलब्ध करण्यात आली आहे. श्री गणेशाचं गुणगान करावे असे प्रत्येकाला वाटतेच, परंतु त्यांना आपल्या जीवनात खरेखुरे आदर्शाचे स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी योगिजन प्रयत्नशील असतात. जनसामान्यांपर्यंत हि आस्था पोहोचावी यासाठी एक दुवा म्हणून ‘‘नाशिक बाप्पा’’ वेबसाईट कार्य करीत आहे. अनके वर्षांच्या दीर्घकालीन अध्ययन केल्यावर जे दुर्लभ ज्ञान हाती लागले आहे ते सर्व श्री गणेश भक्तांपर्यंत पोहोचावे हीच शुद्ध इच्छा मनांत बाळगून वेबसाईट ची निर्मिती केली गेली आहे. श्री गणेशांचे तात्विक स्वरुप आणि मनुष्य शरीर हे एकाच विराटाचे अंग-प्रत्यंग आहे, हे या मिळालेल्या माहितीवरुन जाणिवेस येते.

‘‘शिर्डी साईनाथ संस्था’’,नाशिक मानवतेप्रती सजग राहून अनेक कार्य करीत आहे. कार्य नाशिक शहरात तसेच ग्रामीण पातळीवर अनेक तर्हेने समाजातील दुर्बल घटकांना आरोग्य, शिक्षण तसेच आर्थिकदृष्टया सहकार करीत असते. श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ (शिर्डी) आणि सहजयोग संस्थापिका परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी केलेल्या महान कार्याला प्रेरणास्रोत मानून संस्था कार्यरत आहे.

आम्हां सर्वांना आशा आहे, की आमच्या या सर्वतोपरी नित्य गणेश प्रयत्नांना यशस्वीतेची थाप आपणा सर्व श्री गणेश भक्तांकडून मिळाल्यास आम्ही धन्य भाग समजु.